आज तिला पुन्हा भेटायचे आहे ,
गाडीवर बसवून लांब तिला न्हायचे आहे
निसर्गच सौंदर्य तिला परत दाखवायचे आहे,
मनातल्या माझ्या हितगुज तिला पटवून द्यायचे आहे
आज तिला पुन्हा भेटायचे आहे ...............|| १ ||
गाडी पुन्हा जोरात पळवायची आहे,
मागून काढलेले चिमटे परत मला घायचे आहे
आज पुन्हा त्या वळणावर जायचे आहे
घालवलेले क्षण तिला आठवून द्यायचे आहे
आज तिला पुन्हा भेटायचे आहे .....................|| २ ||
आज पुन्हा त्या नदीवर जायचे आहे
बोटीमध्ये न बसण्याचा हक्क बजावयाचा आहे
केलेल्या चुकांची माफी परत मागायची आहे
आलेला तिचा रुसवा ,हसव्या मध्ये फुलवायचा आहे
आज तिला पुन्हा भेटायचे आहे .....................|| ३ ||
तुझ्यावर प्रेम करतो हे तिला परत बोलायचे आहे
किती प्रेम करतो हे सुद्धा दाखवायचे आहे
मनातल्या भीती तिच्या घालवायची आहे
आडनावातील बदल आता मला घडवून आणायचे आहे
आज तिला पुन्हा भेटायचे आहे ..................मनातल्या भावना माझ्या तिला पटवून द्यायच्या आहे
आज तिला पुन्हा भेटायचे आहे ..........................
आज तिला पुन्हा भेटायचे आहे .............................
चेतन र राजगुरु