काळाच्या ह्या अखंड अन निष्ठुर ओघात
एकमेकांच्या अस्तित्वापासून अजाण......
२० वर्ष.......
समांतर चालत आलेल्या आपल्या आयुष्यांनी...
अचानक परस्परांना छेदून जाणं....
काही काळ रेंगाळलीस तू ही...
एकाच रेषेवर जगलो ही आपण..
पण फक्त.... काही काळच...
भावानांतली तफावत जेव्हा जगण्यात उतरली...
काळाच्या ओघासवे....
आयुष्याची लकेर पुन्हा समांतर झाली....
लपवित लक्तरे आयुष्याची चालत आहे मी ....
तुझ्याचसाठी होतो अन अजूनही तुझ्याचसाठी..
असाच जगत आहे मी.....नामशेष होऊन ही...
कदाचित हाच सापेक्षता वाद असावा.......
--पंकज.......स्वरचित