दर्द तिच्या गझलेतला...
घोट घोट पिऊनी आलो...
आज पुन्हा मैफिलीत तिच्या
मी तुला विसरून आलो...
काळजातली प्रीत तुझी अन
दुखः माझे उधळून आलो...
आज पुन्हा मैफिलीत तिच्या
मी तुला विसरून आलो...
भुलण्या तव दरवळ श्वासातला
हाती मोगरा बांधून आलो...
आज पुन्हा मैफिलीत तिच्या
मी तुला विसरून आलो...
साहिली बेफिकरी,
तव निर्दयी डोळ्यातली..
दिसता कीव नजरेत तिच्या,
असा वर्मी घायाळ झालो..
आज पुन्हा मैफिलीत तिच्या
मी तुला विसरून आलो..
सांगता मैफिलीची, अखेरचा जाम हा
पाहुनी तिला, पुन्हा तुलाच..
साद रिकामी देऊनी आलो...
आज पुन्हा मैफिलीत तिच्या
मी तुला विसरून आलो....
सोडता सोडवेना...आठवांची मगरमिठी..
हातातुनी हात तिचा, मी सोडवून आलो...
आज पुन्हा मैफिलीत तिच्या
मी तुला विसरून आलो...
--पंकज
स्वरचित...