आज तिची त्याला
खूप खूप आठवण आली
धुंदीतच तिच्या त्याची
पावलं बार कडे गेली
एक दोन घोट जेव्हा बीअर चे
जेव्हा त्याच्या पोटात गेले
तिच्या सहवासातले प्रसंग
त्याच्या डोळ्या समोर आले
आठवली पहिली वाहिली भेट
मनात उमलले स्वप्न रंग
आता ग्लासातल्या फेसाबरोबर
मनात उमलणारे तरंग
आठवला तो समुद्र किनारा
खट्याळ लाटांचा फवारा
भरणाऱ्या प्यालाबोबर
अंगावर उमलणारा शहारा
तिचे शब्द तिचे प्रेम
तिचा सहवास स्मरत होता
आता कुठे मध्याचा एक प्याला
रिकामी होत होता
सारे प्रसंग त्याच्या
डोळ्या समोरून तरंगून गेले
आठवणीतच त्याच्या
कित्येक प्याले रिकामी झाले
आठवतं विचारायाचीस कसा सहन
करू शकते कुणाचा स्पर्श
खूप दूर गेली असशील ..तेव्हाच
कळेल तुला त्यातला अर्थ
आठवली ती स्वप्नं
कधी दोघांनी रेखाटली
विचारातच तिच्या
एक बाटली रिकामी झाली
आठवल्या त्या भेटी
मंत्रमुग्ध करणारी प्रीत आठवली
नकळतच त्याच्या कडून
रेपेअटची ओर्डेर गेली
कधी नको रे पीउस
आठवले ते शब्द तिचे त्याला
पण तिचा विरह तो
सांगेल तरी कुणाला
खुपदा सावरले तिचे शब्द त्याने
ती जवळ असताना
पण आता एक शेवट चा प्याला
तिचाच विरह साहताना
विसरायचे तिला त्याने
खूप खूप प्रयत्न केले
पण आज तिची आठवण आली
नि त्याचे पाय परत बार कडे गेले...
दिलीप