तुझी वाट बघण्यात
किती जन्म गेले,
तेही, आता आठवत नाही;
सोडून दिलं मीही, ते दिवस
डोळ्यांत आता साठवत नाही
तुझ्यामागे धावणाऱ्या मनाला
आता थोडं तरी सावरलंय
डोळ्यांची कवाडं बंद करून
अश्रुना मी आवरलंय
स्वप्नातच राहिलेल्या जगाचा
विध्वंस मी पाहिला
आणि त्याचं दु:ख,
घाव बनून उरात राहिला
होतो कधी एक-मेकांचे
तेही तुला आठवत नाही
म्हणून तुला आता
आठवणींची पत्रं मी पाठवत नाही...
--जय