Author Topic: विसरायचे आहे...  (Read 3635 times)

Offline anolakhi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 79
  • Gender: Male
    • http://www.durava.blogspot.com
विसरायचे आहे...
« on: August 06, 2010, 07:55:02 PM »
मला विसरायचे आहे ,

मला विसरायचे आहे कि “माझे  तुझ्यावर  प्रेम  आहे”,

असे मी तुला बोललो होतो,

आणि हेही विसरायचे आहे कि ,

त्याचे उत्तर तू नकारात दिले होते.…

मला विसरायचे आहे ..

 

मला विसरायचे आहे ..

कि तुझ्या नकारा नंतरहि आपल्यात काहीच बदलले नाही,

किंबहूना आपण आणखीनच जवळ आलो ,

मला विसरायचे आहे कि तू मला आणि मी तुला समजायला लागलो ,

मला आज काहीच समजून  घ्यायचे  नाही,

मला फक्त  विसरायचे आहे....

 

मला विसरायचे आहे,

तो वेळ जेव्हा एक-मेकांशी बोलताना आपण वेळांचे भान हरपायचो,

मला विसरायचे आहे त्या वाटा ज्यांवर आपण एकत्र चाललो होतो,

मला हेही विसरायचे आहे कि ,

नंतर मी एकटाच कित्येक वेळ त्या  वाटानवर  तुझ्या पाउलखुणा पहात होतो,

मला विसरायचे आहे...

 

मला विसरायच्या आहेत त्या भेटी ,

जेव्हा समोरा- समोर असून आपल्या नजरा मिळाल्या नाहीत ,

आणि जेव्हा मिळाल्या तेव्हा आपल्याला काही बोलावे लागले नाही..

मला विसरायचे आहे...



मला विसरायचे आहे कि माझ्याकडे तुझ्या काही तसविरी आहेत,

आणि हेही कि त्या तसविरी मी कोठे जपून ठेवल्यात ते,

आणि हेही विसरायचे आहे कि...त्याना मी तासं-तास न्याहाळायचो.........(आणि आजही त्यांच्याशी मी हितगुज साधतो)

मला विसरायचे आहे...



मला विसरायचे आहे कि...मी तुला विसरू शकत नाही...

सांग हे शक्य होईल का?

मी तुला विसरेन का...?

मला विसरायचे आहे...

....निलेश(अनोळखी)











« Last Edit: November 30, 2010, 09:05:57 AM by anolakhi »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Prachi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 201
  • Gender: Female
  • हसरी :-)
Re: विसरायचे आहे...
« Reply #1 on: August 07, 2010, 12:10:03 AM »
 :(

Offline Rahul Kumbhar

  • Hero Member
  • *****
  • Posts: 1,539
  • Gender: Male
Re: विसरायचे आहे...
« Reply #2 on: August 07, 2010, 12:17:29 AM »
mast aahe mitra...mann jinklas re... Real life experience ka??

Offline anolakhi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 79
  • Gender: Male
    • http://www.durava.blogspot.com
Re: विसरायचे आहे...
« Reply #3 on: August 07, 2010, 08:51:29 AM »
cant say exactly is same...but most relevent...

Offline प्रशांत पवार

  • Jr. Member
  • **
  • Posts: 59
  • Gender: Male
  • मंथन-मर्म माझ्या मनाचे
    • मंथन-मर्म माझ्या मनाचे
Re: विसरायचे आहे...
« Reply #4 on: August 07, 2010, 10:25:04 AM »
khup chan mitra masttttttch

Offline sawsac

  • Newbie
  • *
  • Posts: 46
Re: विसरायचे आहे...
« Reply #5 on: August 12, 2010, 01:15:59 PM »
mag visrna tila

Offline pyesaware

  • Newbie
  • *
  • Posts: 17
Re: विसरायचे आहे...
« Reply #6 on: August 25, 2010, 11:12:28 AM »
visarne evadhe sope nahi!!! mast ahea kavita

Offline santoshi.world

  • Sr. Member
  • ****
  • Posts: 1,336
  • Gender: Female
  • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
    • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: विसरायचे आहे...
« Reply #7 on: November 22, 2010, 03:22:34 PM »
chhan ahe ......... kiti hi visarayache mhantale tari visarayala jamat nahi

Offline chetan (टाकाऊ)

  • Jr. Member
  • **
  • Posts: 86
  • Gender: Male
Re: विसरायचे आहे...
« Reply #8 on: November 29, 2010, 04:09:34 PM »
आठवणींना आठवणींची आठवण येते
न क्षणातच आठवणींची बेंधुंद सर मनाला चिंब भिजून जाते
आठवण मग ती डोळ्यात साठवून राहते,
न क्षणातच उघडता डोळे पुन्हा आहे तेच दिसते




मित्रा खूपच छान

हुबे हूब जे प्रश्न तुला उमगले आहे ते इथे हि आहेत मनात

तिला मी असेच विचारले होते

पण तेथून उत्तर मिळाले
हो तू मला आणि मी तुला विसरेन


[अन खर प्रेम असेल तर मनातल हि आपण ओळखतो
आणि तेच झाल
मनात तिच्या आणि डोळ्यात सुद्धा नाहीच होत .


सांभाळ स्वताला मित्रा
मन कशातरी गुंतवण्याचा प्रयत्न कर

मी हि तेच करतोय

Offline sanjiv_n007

  • Newbie
  • *
  • Posts: 39
  • Gender: Male
Re: विसरायचे आहे...
« Reply #9 on: November 29, 2010, 05:56:13 PM »
chan,
tujhyavar ha prasnag aalela ka?

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):