भूलण्या तुला, रोज नव नव्या, रंगात मी रंगतो...
पहिल्या पावसात बिखरून जाती, पुन्हा बेरंग मी उरतो...
आगंतुक सुखे सारी, दुखः भरवश्याचे हृदयी जपतो...
क्षणिक होती प्रीत तुझी ती, शाश्वत विरह घेऊन जगतो...
नवजात माझ्या स्वप्नांसवे, रोज इथे मी झुरून मरतो...
रंगीत तालीम रोजचीच ही, मरणास अशा मी पुरून उरतो...
कोसळता वीज तव आठवणींची, मी जागीच राख होतो..
राखेतूनच पुन्हा उभारी...पुन्हा तुलाच मी हाक देतो......
---पंकज
स्वरचित....