Author Topic: दररोज येतो तो न चुकता  (Read 1151 times)

Offline rupesh

  • Newbie
  • *
  • Posts: 27
दररोज येतो तो न चुकता
« on: August 07, 2010, 04:28:01 PM »
मी :

दररोज येतो तो न चुकता
तासन-तास बसून राहतो
शून्यात लावून नजर कधीतरी
स्वत:शीच काही बोलत असतो

कधी चुकवून नजर इतरांची
हळूच मजला पाहून घेतो
दोन घटकेची व्याकूळ आर्जवता
भरल्या डोळ्यांतून सांडून जातो

" बिनसले असेल काही याचे
मला तर बाई वेडाच वाटतो "
येता जाता कितीतरी डोळ्यांची
नि:शब्द भाषा वाचून घेतो

आता तिरस्काराचा विषय झालाय
गर्दीतही कट्ट्यावर एकटा बसतो
खाल मानेन न जाणे का ?
उपेक्षिताच जगण जगतो

सांग आता तरी सांग मला रे
कोण काटा तुझ्या उरात सलतो
गाभाऱ्यात मीही आताशा
कशास उगीच घायाळ होतो

" गर्दी बघ ही तुझ्या समोरची
का उगीच मजवरी वेळ घालवतो "
जळजळीत टाकून कटाक्ष तोवर
मलाच उलट प्रश्न विचारतो

तो :

भक्तीभाव थोडाच इथे
वशिले बाजीचा बाजार भरतो
काय हव ते टाक देऊन एकदाच
नवसांचा फुका का डाव मांडतो

आठवण रहावी तुझीच सदैव
म्हणूनच जगा तू दु:ख देतो
सोड आतातरी नाद हा खुळा
सांगण्यास केवळ मी इथे बसतो

मी :

तो नव्हता बहुधा भक्त माझा
कुणी त्याला नास्तिक म्हणतो
फार दिवसांनी भेटला असा
मी तर त्याला मित्र मानतो

कळले सारे मज मनातले
दररोज का तो इथे बसतो
मंदिरातला कट्टा मग आता
सदासर्वकाळ रिकामा असतो...

rupesh baji

Marathi Kavita : मराठी कविता


Offline nil..(0)

  • Newbie
  • *
  • Posts: 17
  • nil
    • my other blogs
Re: दररोज येतो तो न चुकता
« Reply #1 on: October 29, 2010, 03:05:24 PM »
kharach bhaaari ahe....