असं मला करायचं नव्हतं
तुझं मन तोडायचं नव्हतं
अबोल बसली कशासाठी
माझ्यासंगे बोलायचं नव्हतं?
फुलेच दिली सारी तुला
काट्यावणी बोचायचं नव्हतं
साथ देणार होतो जन्माची
अर्ध्यावर सोडायचं नव्हतं
पण माझ्या व्यर्थ आसवांशी
नातं तुझा जोडायचं नव्हतं
असं मला करायचं नव्हतं
तुझं मन तोडायचं नव्हतं
--जय