Author Topic: - आणू कशी ?  (Read 904 times)

Offline rupesh

 • Newbie
 • *
 • Posts: 27
- आणू कशी ?
« on: August 16, 2010, 08:36:29 PM »
---- आणू कशी ?
----

समुद्रीवादळ हेलकावली नौका
किना-यावर आणू कशी ?
भळभळत्या जखमांचा पूर,
आटोक्यात आणू कशी ?

बेहिशोब आयुष्य सारे,
ताळमेळ जुळवू कशी ?
भग्न स्वप्नांचे तुकडे,
एकसंध जोडू कशी ?

माजला काहूर मनी,
शांत तया करू कशी ?
वाढत जाणा-या अपेक्षा,
पूर्तता करू कशी ?

निसटून गेलेल्या क्षणांना,
पुन्हा माघारी आणू कशी ?
वर्तमान जगायला उत्साह,
उसना मी आणू कशी ?

माझेच चुकत असावे,
'मलाच' समजावू कशी ?
दुर्मिळ अपुल्या जीवनात,
बहार मी आणू कशी ?

----- अस्मिता

Marathi Kavita : मराठी कविता


Offline aspradhan

 • Jr. Member
 • **
 • Posts: 187
 • Gender: Male
 • कविता म्हणजे भावनांचं चित्र!
Re: - आणू कशी ?
« Reply #1 on: August 16, 2010, 09:54:29 PM »
 Very nice!!


Offline amoul

 • Full Member
 • ***
 • Posts: 654
 • Gender: Male
 • tAKE iT eASY
Re: - आणू कशी ?
« Reply #2 on: August 17, 2010, 09:45:03 AM »
mast!!

Offline ghodekarbharati

 • Jr. Member
 • **
 • Posts: 124
Re: - आणू कशी ?
« Reply #3 on: August 17, 2010, 04:10:15 PM »
Chan ahe.