Author Topic: माझा एकटेपणा  (Read 12298 times)

Offline rups

  • Jr. Member
  • **
  • Posts: 55
माझा एकटेपणा
« on: August 17, 2010, 03:40:46 PM »
कोणी सोबत नसल तरी,तरी तो माझ्या सोबत असतो,झालेच कधी दु:ख अनावर,तर येउन हलकेच अश्रु पुसतो .
कोणी नाही म्हणून काय झाले, "मी आहे ना " म्हणतो,कितीही जण असतील सोबत तरी,तोच एकटा मला जाणतो .
 
कधी आनंदाची उघडून कवाड, मी जाते दुस-यापाशी,पण ते रमलेले त्यांच्याच विश्वात पाहून, मी परत येते होते तशी .
मग तो म्हणतो,"उदास नको होऊ, मी आहे ना तुझ्याजवळ,सांग मला तुझा आनंद,माझ्यात विरून जाइल तुझी कळ " .
 
कधी एखादा क्षण हळवा,भिजवतो डोळ्याची पापणी,ओघळले जरी लाख अश्रु,पुसाया नसते कोणी ,
मग परत जवळ येतो तो,माझे अश्रु वाटुन घेतो,शब्दानच्याही पलीकडचा आनंद,ओंजळीत माझ्या देऊन जातो.
 
कधी येतो खुप राग,पण हक्काच माणूस नसत काढायला,उधाणलेल्या त्या सगारामधून,मला किनारी आणून सोडायला .
पण अशा वेळी माझ्याबरोबर, खुप खोल तो येतो ,करुन माझे सांत्वन ,हळूच मिठीत त्याच्या घेतो .
 
कधी चलबिचल होते मनाची,वाटते खुप अस्वस्थ,पण बोलायला समोर कोणीच नसत, सगळे आपल्याच विश्वात मस्त .
तेंव्हा मन माझे जाणायाला,तो माझ्या जवळ येतो,झेलुनी दु:ख अंतरीचे,मला बोलकेपण तो देतो.
 
कधी ओथंबतात भावना,अन अडतात मनाच्या दारी,साचून राहतात तशाच मनी,जरी सोबत असतील सारी.
अशा वेळी त्याच्या मनाचे दार,तो माझ्यासाठी उघडतो ,मग मानून समाधान,मनाचा पारवा त्यातच बागड़तो .
 
वाटत असेल वाचताना,खरच कोण असेल तो ?एवढा सांभाळून घेणारा,खरच खुप गुणी दिसतो .
पण खरतर ह्या जगात,कोणीच कोणाच नसत,असेलच कोणी सोबत तर,केवळ मृगजळच असत.
 
म्हणुनच मी स्वीकारली सोबत त्याची,खात्री आहे मला तो कधी नाही सोडणार ह्याची .
कोणाला पटेल किंवा नाही पटणार कुणा,आयुष्यभर अन आयुष्यानंतर सोबत राहील " माझा एकटेपणा "
 
आयुष्याच्या वाटेवरती मी खुपदा अडखळले ,रस्ता वाळणाचा होता जरी, सोबत होते सगळे.
पण राहिला अखंड सोबत, तो माझा एकटेपणा,व्यापुनी सारी धरती , त्याने जिंकले आहे मना.

लोकाना नको वाटतो एकटेपणा,पण तोच खरा सोबती,क्षण दोन क्षण सोबत देणारी, सारी खोटी असतात नाती .
कितीही आली संकट, तरी नाहीं झीजणार ज्याचा कणा,असा माझा अखंड सोबती , " माझा एकटेपणा "!!!!!!!!!!!!
« Last Edit: August 18, 2010, 03:51:17 PM by rups »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline reema

  • Newbie
  • *
  • Posts: 8
Re: माझा एकटेपणा
« Reply #1 on: August 18, 2010, 10:36:01 AM »
realy yaar....
hats off to u
mazya kade words nahit tuzi stuti kayayala
mala kavita khup avadali
god bless u :)

Offline rups

  • Jr. Member
  • **
  • Posts: 55
Re: माझा एकटेपणा
« Reply #2 on: August 18, 2010, 03:45:19 PM »
thanks reema

Offline rudra

  • Full Member
  • ***
  • Posts: 851
  • Gender: Male
  • आसवांचा प्रांत माझा,दुखांचे दुर्ग माझे..वेदनेचा खड्ग माझा,जखमांचे सैन्य माझे..
    • My kavita / charolya
Re: माझा एकटेपणा
« Reply #3 on: August 18, 2010, 07:28:04 PM »
very good thoughts 4m rups. bt,rups did u knw wt u write. its a part of guzzul. here wt u wrong its a very lethy.wn poeter creates things he wanaa serve lots of knwladge in de short lines.okyee my dear........................................................ 8)   

Offline minakshi.ghodake

  • Newbie
  • *
  • Posts: 2
Re: माझा एकटेपणा
« Reply #4 on: August 19, 2010, 05:26:17 PM »
KHUP CHAN KAVITA AHE

Offline pyesaware

  • Newbie
  • *
  • Posts: 17
Re: माझा एकटेपणा
« Reply #5 on: August 20, 2010, 01:14:01 PM »
mast ahea kavita!!! khupach chan

Offline puja

  • Newbie
  • *
  • Posts: 31
Re: माझा एकटेपणा
« Reply #6 on: September 06, 2010, 02:48:52 PM »
chhan aahe kavita..........

Offline chetan350

  • Newbie
  • *
  • Posts: 4
Re: माझा एकटेपणा
« Reply #7 on: February 13, 2011, 01:02:40 AM »
1no:)

Offline Lucky Sir

  • Jr. Member
  • **
  • Posts: 58
Re: माझा एकटेपणा
« Reply #8 on: February 13, 2011, 01:17:34 PM »
agdi sunder ahe kavita... manachya pratyek chhatancha anubhav ahe... ektepanache satya ahe... too gud really too goooooood :)

Offline rups

  • Jr. Member
  • **
  • Posts: 55
Re: माझा एकटेपणा
« Reply #9 on: February 13, 2011, 01:24:58 PM »
Thaks alot guys...:)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
दहा अधिक दोन किती ? (answer in English):