तुझ्या विरहाच्या भट्टीत...
क्षण क्षण जाळून स्वतःला...
तप्त.. लाल..धगधगणाऱ्या
माझ्या ह्या भावनारसाला..
होरपळलेल्या मनाने...
रक्तांकित हाताने...
शब्दरूपी साच्यात ढाळून...
तुझ्या आठवांना मी
कवितेत बांधले आहे...
माझ्या आसवांनी त्यांचा...
दाहाग्नी शांत केला आहे....
बघ एकदा हातात घेउन ती पाने..
पेलवनार नाहीत तुला कधीच ती...
-पंकज
स्वरचित..........