विस्तीर्ण मनाच्या अवकाशातील...
भावनांच्या आकाशगंगेत ..
विखुरली आहेत तुझ्या आठवणींची ताराकापुंजे
लक्ष लक्ष प्रकाशवर्षे दूर...
त्यातलाच एक पुंज...आपल्या शेवटच्या भेटीचा...
कोसळला काल रात्री..
स्वअस्तित्वाचे वस्तुमान.. पेलवले नाही त्याला...
त्याच्या अंतातुनच तुझ्या आठवांचा...
तिथे कृष्णविवरी पुनर्जन्म झाला...
खेचल्या भावना साऱ्या त्याने ...संपल्या संवेदनाही...
अडकले मन असे काही..त्या अदृश्य कृष्णविवरात ...
न उरले जगण्यास काही आता ..
जसा शुन्यात मी अन शुन्य ही माझ्यात...
माझ्यासवे ह्या घटना-क्षितिजी.. प्रकाशवेग ही स्तब्ध झाला...
अनंतासाठीची जन्मठेप ही....इथे काळ देखिल गोठावला....
-पंकज
स्वरचित......