हा नविन thread सुरु करत आहे...जिथे ती असताना माझी लाइफ कशी होती आणि आता ती नसताना कशी बदलली असून देखिल अगदी same आधी सारखीच आहे.....त्याचं वर्णन करण्याचा एक छोटासा प्रयत्न....
1.
तू असताना...
कधी पायाखाली चिरडून...
कधी पाण्यामधे बुडवून...
कधी कधी तर अक्षरशः...
दोन तुकडे करून....
माझ्या हातातील सिगारेट्ला..
रोज नविन उपायाने मारलास....
आणि मला कधीच सिगरेट पिऊ नाही दिलीस....
आता तू नसताना...
मी रोज नविन सिगरेट पेटवतो...
हातात ती जळते आणि मनात तुझ्या आठवणी...
जेव्हा येतो परत भानावर.....
हातात थोटुक....अन खाली राख असते फ़क्त...
साला आजपण नाही पिऊ दिलीस मला तू...
-पंकज