तुला माझ्या स्वप्नांत येताना
काहीच का रे नाही वाटत.....
हळूच कुणी तरी बघेल
ह्याची भीती नाही का दाटत....
हलकेच माझा हात धरतोस...
मला जवळ ओढतोस...
त्या स्पर्शाने माझे अंग मात्र मोहरवतोस....
माझा लटका राग बघुन गालातल्या गालात हसतोस्...
का अस सारखं सारखं मला चिडवतोस.........
तुला ह्याच काहीच नाही का रे वाटत?
कधी-कधी फक़्त दुरुनच बघतोस...
तिरपे कटाक्ष टाकून मला
घायाळ करतोस..
मग् हळू-हळू त्या धुक्यांत नाहीसा होतोस
अन् मला बेचैन करुन जातोस...
तुला ह्याच काहीच नाही का रे वाटत ?.........
कधी तु सुंदर राजकुमार होउन पांढर्या घोड्यावर बसतोस....
मुंडावळ्या बांधून,हळूच अंतरपाटाच्या आडून दिसतोस...
पण फ़क़्त स्वप्नांच्याच राज्यात का रे मला खुणावतोस...
सांग ना रे प्रत्यक्षात कुठे आणि कधी भेटतोस?...
यायला वेळ लावून का रे मला छळतोस...
तुला ह्याच काहीच वाटत नसाव म्हणुनच माझ्याशी अस वागतोस......