2.
तू असताना....
तुला भेटण्यासाठी मी आपला
अगदी टापटिप होउन यायचो..
केस विंचरुन सेट करण्यात
एक एक तास घालायचो...
अन तू आपलं येताच...
माझे सर्व केस विचकटुन टाकायचिस...
"तू ना वेंधळाच मस्त दिसतोस"..असं बोलायचिस....
आता तू नसताना...
मी रोज ऑफिसला ..
अगदी टापटिप होउन जातो...
केस सेट करण्याची इच्छा नसताना देखिल...
उगीच तासभर झटतो.....
कसेबसे केसांना चोपवुन घराबाहेर पडताच..
तुझ्या आठवणींचा थवा..वाऱ्यावर स्वार होउन येतो
अगदी तुझ्याचप्रमाने....पुन्हा एकदा
सर्व केस विचकटुन जातो...
आणि मग ऑफिसमधे पोहचल्यावर
सगळे मला म्हणतात....
"अरे जरा केस विंचरुन येत जा...
किती वेंधळ्यासरखा राहतोस "
-पंकज