तू असताना....
आपण रात्र रात्र जागायचो...
रात्रभर बोलत रहायचो....
कधी एखाद्या रात्री..तुझी बडबड ऐकताना...
मी हळूच पेंगायचो....
आणि मग तू करकचून काढलेल्या चिमट्याने...
दचकून जागा व्हायचो...
रात्रभर जागल्यामुळे दुसऱ्या दिवशी मग...
ऑफिसला दांडी मारायचो..
आता तू नसताना देखिल....
मी रात्र रात्र जागतो...
कधी स्वतःशी...तर कधी तुझ्या आठवाणींशी..
मनसोक्त गप्पा मारत राहतो...
आणि हो...अजुन देखिल...
तुझी ती बडबड माझ्या कानात गुणगुणत राहते....
आणि जरासा डोळा लागताच...
मी पुन्हा दचकून जगा होतो...
तुझ्या आठवणी मनाला फारच जोरात चिमटा काढतात ग....
अन मग नेहमीप्रमाने पुन्हा एकदा मी
रात्र जागुन काढतो...अन दुसऱ्या दिवशी
ऑफिसला पण दांडी मारतो.....
- पंकज