आज हि नभात दिसतोय तोच चंद्र नि तोच तारा
तुला भेटूनच मज भेटण्यास आला तो गार गार वारा
आठवणी ताज्या करीत राहतो नभातला तो लुकलुकता तारा
पाहुनी मग तयासी मन आसमंत होतो मज सारा
प्रश्न तुझा नेहमीचाच तो
कुठे आहेस ?? काय करतोय??
उत्तर माझे एकच
त्याच ठिकाणी जाऊन मी माझ्या मनाला शोधतोय.
मनाला माझ्या एकच
प्रश्न मी मग विचारतोय
मला न भेटताच
माझा मन कस काय एकट राहतंय
आज पुन्हा माझे नयन तिला पाहण्यास आतुर झाले होते
तिच्या नयनांना भिडून माझे प्रेम व्यक्त करणार होते
दुख तिच्या मनातले सर्व ते घालविणार होते
होटावर तिच्या स्मित हास्य फुलविणार होते
पण......
ती काही आली नाही
नयनातील अश्रू मग थांबले नाही
मग वेड्याच मनाने
माझ्या नयनांना समजावले
तिच्या आठवणी ताज्या करून
नयनांना स्मित हास्यात खुलवले
पापण्यांनी हि वेड्या मनाला साथ दिली
पापणी घट्ट मिटून ओळी दुख तिने सुकी केली
मनाला माझ्या एकच हवे आहे
तू आनंदी राहावी हेच तो मागत आहे
तू नाही भेटली आज हे
पावसाला हि कळले आहे
तुझ्या विरहात मला दुखी पाहून
आता तो हि अश्रू ढाळत आहे
पण तू मात्र आनंदी रहा,हेच मला तो सांगत आहे
साचलेल्या पाण्यामध्ये तो तिचेच प्रतिबिंब उमटवत आहे
चेतन राजगुरू
२५-०८-२०१० ११:३५ pm