तू असताना...
नेहमीचच होत ते...रोज संध्याकाळी...
हातात हात गुम्फुन..आपलं चालत राहणं....
चालताना हरेक क्षण..मी तुझ्याकडेच बघत राहणं....
आणि मग ठरलेल्या जागी...वाटेतील त्या खळग्यात
माझा तोल जाणं..तुझं पटकन मला सावरणं...
"अरे पुढे बघ..खळगा येतोय" असं..
कधीच तू मला सांगितला नाहीस..
तुलाही आवडायचं....मला सावरणं...
माझं तुझ्यात गुंतून राहणं...
आता तू नसताना देखिल....
मी रोज त्याच पाऊल वाटेवरून...
जुनी पदचिन्हे गिरवत राहतो...
आज अड़खळायचं नाही...असं...
स्वतःलाच बजावत राहतो...
पण तो खळगा समोर येताच...
माझ्या धडपडनाऱ्या...तू मला सावरनाऱ्या..
त्या सर्व आठवणी...लगोलग दाटून येतात..
आठवांच्या त्या धुक्यातून वाट शोधताना...
मी पुन्हा..रोजच्याच प्रमाने...त्या खळग्यात अड़खळतो..
आणि रोजच्याच प्रमाने आज देखिल....
सांगितलं नाहीस तू मला....
अन सावरलं देखिल नाहीस...
-पंकज
स्वरचित.....