Author Topic: घात केला  (Read 1060 times)

Offline futsal25

  • Newbie
  • *
  • Posts: 46
  • Gender: Male
    • माझ्या काही कविता (My few poems)
घात केला
« on: September 01, 2010, 12:54:10 AM »
दैंवाने कठोर आघात केला
प्रेयसिने प्रेमात घात केला

मानुन आपले सर्वस्व अर्पिले
तिने सर्वस्व लुटुन घात केला

शब्दांवर, वचनांवर भाळुन प्रित केली
शब्दांना फिरवुन, वचनांना मोडुन घात केला

गाभा-यात ह्र्दयाच्या प्राणप्रतिष्ठा केली
तिने ह्र्दयमंदिर तोडुन घात केला

डोळ्यांचे ईशारे, नजरेचे बहाणे
नजर फिरवुन घात केला

मखमली केसांच्या सावलीत झोपलो
तिने केसाने गळा कापुन घात केला


- सौरभ सुधीर परांजपे (ठाणे)  :(  :)  ;)


Marathi Kavita : मराठी कविता