Author Topic: तू पुन्हा येऊ नकोस  (Read 1288 times)

Offline Jai dait

 • Jr. Member
 • **
 • Posts: 75
तू पुन्हा येऊ नकोस
« on: September 03, 2010, 06:21:09 PM »
तू पुन्हा येऊ नकोस,
घायाळ मनाला आणखी घाव देऊ नकोस
तुझ्या स्वार्थाला प्रेमाचं नाव देऊ नकोस
तू पुन्हा येऊ नकोस
 
घेतल्या होत्या शपथा किती, वचने किती
राहू दे माझ्याकडे, परत आता घेऊ नकोस
तू पुन्हा येऊ नकोस
 
आहेत जखमा आधीच इतक्या, त्यात
आता हृदयात आठवणींचे छाप ठेवू नकोस
तू पुन्हा येऊ नकोस
 
सारंच तर तू घेऊन गेलीस माझं
आता हे प्राण तेवढे माझे तू नेऊ नकोस
तू पुन्हा येऊ नकोस!!

  -जय

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: तू पुन्हा येऊ नकोस
« Reply #1 on: September 03, 2010, 11:45:56 PM »
apratim ........... khup avadali :) .......... mast lines ahet hya

तू पुन्हा येऊ नकोस,
घायाळ मनाला आणखी घाव देऊ नकोस
तुझ्या स्वार्थाला प्रेमाचं नाव देऊ नकोस

आहेत जखमा आधीच इतक्या, त्यात
आता हृदयात आठवणींचे छाप ठेवू नकोस
तू पुन्हा येऊ नकोस

Offline Jai dait

 • Jr. Member
 • **
 • Posts: 75
Re: तू पुन्हा येऊ नकोस
« Reply #2 on: September 04, 2010, 08:16:04 AM »
dhanyavaad!!

Offline sanraj

 • Newbie
 • *
 • Posts: 21
Re: तू पुन्हा येऊ नकोस
« Reply #3 on: October 31, 2010, 04:57:35 PM »
chhannnnnnnnn