Author Topic: तेव्हाही  (Read 887 times)

Offline anolakhi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 79
  • Gender: Male
    • http://www.durava.blogspot.com
तेव्हाही
« on: September 04, 2010, 02:38:27 PM »
काही दिवसानी जेव्हा आपण एका रस्त्यावरून,
समोरा-समोर चालत असू,
आणि प्रत्येक पवालागाणिक आपल्यातली कमी होणारे अंतर,
आपल्या मनातील अंतराची जाणिव करत असतील,
तेव्हाही मी तुला विसरण्याचा फ़क्त प्रयत्न करत असेल...तेव्हाही तू अशीच असशील ना?
जेव्हा आपल्यातली अंतर निरुत्तर झालेली असतील...
तेव्हाही तू अशीच हसशील ना?
जेव्हा जवळून जाताना आपल्या सावल्या,
एक-मेकात अडखळतिल ...
तेव्हाही तू अशीच रागे भरशील ना?
जेव्हा आपल्यातली अंतर आपली नाते सुचवतील...
तेव्हाही तू अशीच रुसशील ना?
जेव्हा आपली रुसवे-फुगवे एक-मेकान्वर नसतील...
तेव्हाही तू मला अशीच आठवशील ना?
जेव्हा तुला,मला विसरान्याशिवाय काहीच आठवणार नाही....

अनोळखी(निलेश)

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Nilesh Tapkir

  • Newbie
  • *
  • Posts: 4
Re: तेव्हाही
« Reply #1 on: October 05, 2010, 09:13:35 PM »
______