Author Topic: माझ्या हेल्मेटच्या काचेवर  (Read 1305 times)

Offline chetan (टाकाऊ)

 • Jr. Member
 • **
 • Posts: 86
 • Gender: Male
दोन चाकांवर तोल आणि जीव सांभाळत मैलोनमैल भटकणार्या माझ्या समव्यसनी मित्रांस..
 
माझ्या हेल्मेटच्या काचेवर
 
माझ्या हेल्मेटच्या काचेवर, जेव्हा वळीव बरसतो 
तेव्हा पावसावर चिडणारा मी, हात सोडून नाचू लागतो   

माझ्या हेल्मेटच्या काचेवर, जेव्हा चिखल सडा शिंपतो
तेव्हा भिजल्या मातीचा सुगंध, अलगद मनात दरवळतो
 
माझ्या हेल्मेटच्या काचेवर, जेव्हा कोवळी किरणं येतात
तेव्हा खात्री पटते, तिमिरातूनी तेजाकडे गेल्याची
 
माझ्या हेल्मेटच्या काचेवर, जेव्हा कुणी पक्षी शीटतो
तेव्हा तंद्रीतून जागं केल्याचा, मला अनुभव येतो 
 
माझ्या हेल्मेटच्या काचेवर, जेव्हा अभागी किडा फुटतो   
तेव्हा हळव्या स्वरात मी, फक्त "बिच्चारा" म्हणतो
 
माझ्या हेल्मेटच्या काचेवर, कुणी गाडीवान थुंकतो
तो वळून पाहताना ओशाळतो, मी हसून संतपद घेतो   
 
माझ्या हेल्मेटच्या काचेवर, जेव्हा धूळअक्षरे गिरवतो
तेव्हा आठवतो मुक्काम, आडगावातल्या शाळेतला       
 
माझ्या हेल्मेटच्या काचेवर, जेव्हा वारीत गुलाल पसरतो
तेव्हा समाधान लाभतं, .........  ३३ कोटी पावल्याचं
 
माझ्या हेल्मेटच्या काचेवर, जेवा अपघातात तडे उमटतात
तेव्हा कळून येतं, भंगलेली स्वप्न कशी दिसतात
 
अशी सोशिक काच, जेव्हा बदलायची वेळ येते
तेव्हा दुःख होतं, अनुभवी साथीदार गमावल्याचं
 
अन हीच काच जेव्हा, मी माझ्या खोलीत ठेवतो
तेव्हा आनंद मिळतो, एक शौर्यपदक कमावल्याचा   
--
KAvi majha MItra
MAkarand Ketkar

Pantana Amchya Kuthe Kay suchel
Dev jaane
HI kavita Amhas Suchali Thane Te Pune Pravas Kartaana

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Nitesh_Joshi

 • Newbie
 • *
 • Posts: 6
Re: माझ्या हेल्मेटच्या काचेवर
« Reply #1 on: September 08, 2010, 12:47:37 PM »
Sahi he bhidu

Offline PRASAD NADKARNI

 • Jr. Member
 • **
 • Posts: 378
 • Gender: Male
 • Life:-a combination of adjustments & compromises
Re: माझ्या हेल्मेटच्या काचेवर
« Reply #2 on: September 08, 2010, 02:15:04 PM »
nice1

Offline chetan350

 • Newbie
 • *
 • Posts: 4
gud1 yar 1no:)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
नाऊ वजा एक किती ? (answer in English number):