माझ्याशी ती नेहमी हरते, माझ्या बरोबर ती नेहमी रडते.
तिने जिंकाव अन मी रडाव अस मला रोज वाटत.
पण ती मला रडू देत नाही.
मी रागावतो हे तिला आवडत नाही,पण मी का रागावतो हे हे ती समजुन घेत नाही.
ऐक दिवस ती मला सोडून जाइल. मी तिथेच असेन तिची वाट बघत.
पण ती येणार नाही.
आणि त्या वेळेस हीच खंत मनात टोचत राहिल,आणि तेव्हा डोळ्यातून पानी येताना तू जवळ नसेल.
मग हेच शब्द होठावर येतील
गेल्या सरून त्या आठवणी पाणी आले ग डोळ्यात,
होती आस मृगजलाची हाती आले ग निवडुंग,
नव्हती लायकी मित्रत्वाची माझ्यात हे सांगितले सर्वानी,
पण वेडी आस ह्या मनाची असावी तू सोबती .