मित्र/मैत्रिणींनो,
आज मी तुम्हाला, प्रेमासाठी तरसलेल्या प्रेमिकांची कविता-गीत ऐकवितो. "मुझे तेरी मोहब्बत का सहारा मिल गया होता"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपली फेब्रुवारी महिन्याची ही सोमवार-सायंकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.
--मूळ हिंदी गाणे-(मुझे तेरी मोहब्बत का सहारा मिल गया होता)
-------------------------------------------------------
"मला फक्त तू हवी होतीस, फक्त तुझं प्रेम हवं होत !"
-----------------------------------------------
मला फक्त तू हवी होतीस,
फक्त तुझं प्रेम हवं होत !
खूप होत्या तमन्ना, बऱ्याच होत्या इच्छा,
नशिबात आहे तेच मिळालं होतं.
मला फक्त तू हवी होतीस,
फक्त तुझं प्रेम हवं होतं !
तरसत होतो मी तुझ्या प्रेमासाठी,
जितकं जवळ, तितकंच ते दूर होतं.
याच एका आशेवर मी होतो
की ती बहार केव्हा येईल ?
पण या आशेने माझी निराशाच केली, 😒
तुझ्या सहाऱ्याची माझी उम्मीदच मेली.
प्रिया, मलाही तुझा सहारा हवा होता
प्रिया, मलाही तुझं प्रेम हवं होतं
या वादळाने माझं जीवन उध्वस्त केलं,
किनारा माझा दूरच राहिला होता.
कदाचित नशिबाला हे मान्य नसावं
कदाचित नियतीला हे अमान्य असावं
आपली भेट होता होता राहीली,
ही विरहिणी विरह गीत गात राहीली.
आपल्या नशिबात बहरच नव्हतI
आपल्या नशिबात बागच नव्हती
फुले होती, ती सारी कोमेजलेली,
झाडे वठलेली, पाने गळून पडलेली.
आता ते दृश्य कधीही दिसणार नाही
तुझ्या माझ्या आयुष्यात बहार कधीच येणार नाही
माझ्या नजरेतून तू ते पाहिलं असतंस,
हे दृश्य आपण डोळ्यात साठवलं असतं.
वादळात माझी नाव अजुनी डगमगतेय
सुकाणू कोलमडलंय, अजुनी ती हेलकावतेय
दूरवरचा किनारा अजुनी दूरच राहिलाय,
लाटांच्या माऱ्यात नाव माझी डचमळतेय.
तुला खुश पाहून मीही खुश झालो असतो 😊
तुला आनंदी पाहून मीही आनंदी असतो 😊
तुझे मन मी नेहमीच सांभाळले असते,
तुझ्या मनाला मी जीवापाड जपले असते.
माझी सारी ख़ुशी मी तुला दिली असती 😊
बदल्यात तुझे अश्रू मी घेतले असते 😢
माझ्या बदल्यात तू हसली असतीस, 😊
तुझ्या बदल्यात मी रडलो असतो. 😂
कदाचित मी तुझ दुःख घेऊ शकलो असतो
कदाचित मी तुझा हमदर्द होऊ शकलो असतो
पण नियतीला हे कधीही मंजूर नव्हतं,
आपल्या नशिबात हे लिहीलंच नव्हतं.
तुझ्याप्रमाणेच मीही दूर फेकला गेलो
या प्रवाहात मी भरकटत राहिलो
आपले मिलन, आपले भेटणे दूरच राहिले, 💑
या प्रवाहात आपण फक्त गटांगळ्याच खात राहिलो.
ते नशिबवानच आहेत ज्यांना हे सुख मिळालंय
ते नशिबवानच आहेत ज्यांना हे प्रेम मिळालंय
त्यांच्या नशिबात शुभ्र चंद्र आणि चांदणी आहे,
आपल्या नशिबात रखरखती वाळवंटी विराणी आहे.
बस मला नशिबाला इतकंच विचारायचं
मला त्याच्याकडे एवढीच तक्रार करायचीय
चंद्र आणि चांदणी नकोत मजला चंदेरी,
देशील का मला तुटलेल्या ताऱ्याची लुप्त निस्तेजकारी.
आपल्या नशिबात प्रेमचं नाही
आपल्या नशिबात आपली भेटच नाही
असाच विरह सहन करायचंIय आपल्याला,
वादळाला तोंड देत राहायचंय आपल्याला.
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-27.02.2023-सोमवार.
=========================================