झाले फरार चेहरे
लेवूनी जरी मुखवटे
कबंधास या माझ्या
सखे भान होते कुठे ..?
स्वप्ने धुकाळ झाली
झोप दगाबाज माझी
स्वप्नात तू.., मनी ते
तुझेच आभास होते…!
नको ती याद सुखांची
जोजवणे उदास माझे
भारलेल्या रात्री अन्
दिवसही तुझेच होते..!
फसवी मनास हळव्या
श्वासही फितूर माझा
एकटाच मी.., अन्
सोबती नि:श्वास होते..!
विशाल