Author Topic: सोडून ये सगळं काही...  (Read 1174 times)

Offline amit.dodake

  • Jr. Member
  • **
  • Posts: 60
सोडून ये सगळं काही...
« on: October 08, 2010, 10:17:11 PM »
सोडून ये सगळं काही...


सोडून ये सगळं काही...
सोडून ये सगळं काही...
तोडून ये बंधनं सारी

घे एकदाची संधी हेरावून...
घे एकदाची संधी हेरावून...
घट्ट मिठी मार मला एकदाशी

कवळून घे मला तू..
कवळून घे मला तू...
जसे कवळते धरती गगनाला

ऐक माझे निःशब्द श्वास..
ऐक माझे निःशब्द श्वास...
बोलका करेल तुला हा गोड सहवास

अश्रूंनी भरलेले माझे डोळे ..
अश्रूंनी भरलेले माझे डोळे ..
विलक्षण तुझी वाट पाहतात

अश्रू आहेत का नुसतंच पाणी..?
अश्रू आहेत का नुसतंच पाणी..?
तुझ्या आठवणीत झरयासारखे वाहतात

आपल्यांनाच परकं काही लोक करून जातात...
आपल्यांनाच परकं काही लोक करून जातात...
सुखादुखात साथ देणारे कुठल्यातरी वहीतल्या पिंपळपानात सापडतात

कधीच होऊ शकणार नाहीस तू माझी, असा नकार तू दिलास..
कधीच होऊ शकणार नाहीस तू माझी, असा नकार तू दिलास..
हृदयाने धडधड्ण्यास साफ नकार दिला

उशिरा का होईना पण आलीस तू खरी....
उशिरा का होईना पण आलीस तू खरी....
घेऊन जाताना माझ्या प्रेताला, तू रडलीस तरी खरी

रडू नकोस प्रिये हस अशी एकदा ..
रडू नकोस प्रिये हस अशी एकदा ..
जळताना तरी पाहूदे... तुझं हसू फक्त एकदा..

-Aapla amit 
« Last Edit: February 06, 2011, 07:38:40 PM by amit.dodake »

Marathi Kavita : मराठी कविता