मित्र/मैत्रिणींनो,
आज मी तुम्हाला, पावसातली एक विरह कविता-गीत ऐकवितो. "आग लगे तन मन में, जब पानी बरसे हाय"- या हिंदी गाण्यावर ते आधारित आहे. आशा आहे ते तुम्हाला आवडेल. भरभरून लाईक करा, व मला प्रोत्साहित करा. आपणा सर्वांस सप्टेंबर महिन्याची ही संपूर्ण अंबरावर मळभ आलेली, परंतु गार, थंड वाऱ्याने शहIरलेली रविवार-सकाळ आनंदाची जावो, ही सदिच्छा.
--मूळ हिंदी गाणे-( आग लगे तन मन में, जब पानी बरसे हाय )
------------------------------------------------------
"देहात फुललाय निखारा, व्याकुळ आहे मन, पावसाच्या जलधारा, पोळताहेत तन बदन" --------------------------------------------------------------------------
देहात फुललाय निखारा, व्याकुळ आहे मन
पावसाच्या जलधारा, पोळताहेत तन बदन
श्रावण आलाय, पावसाचा जोर वाढलाय,
पाण्याच्या सतत शिडकाव्याने भरून वाहतंय अंगण
देहात फुललाय निखारा, व्याकुळ आहे मन
पावसाच्या जलधारा, पोळताहेत तन बदन
हा सावन असाच आहे, पावसाला आमंत्रण देत आहे,
तृषित भुईला तो अमृत जलाचे आंदण देत आहे
मलाही लागलीय तहान, त्या तृषित मृत्तिकेसम
अंगात पसरलीय अगन, त्या पेटलेल्या वणव्यासम
हा सावन येतो काय, पावसाच्या धारांनी भिजवतो काय,
मन अतृप्त ठेवतो काय, देहाला जIळत जातो काय
हा ऋतू असा कसा, सृष्टी सारी बहरवतो ना
हा ऋतू असा कसा, सृष्टीला हिरवळीने नटवतो ना
हा ऋतू असा कसा, शीत जलधाराना बरसवतो ना,
मग माझ्याच तना मनाची का त्याने केलीय बरं दैना ?
तृषार्त आहे मी, आता माझी ही तृष्णा कशी बरं भागेल ?
अतृप्त आहे मी, आता माझी तृप्ती कोण बरं करेल ?
तो सावन आग लावून गेलाय साऱ्या देहIला, अंतर्बाह्य,
हा मला जाळणारा अग्नी आता कसा बरं विझेल, कोण बरं विझवेल ?
अश्यात तुझी याद येतेय साजणा, तुला मी साद देतेय
अश्यात तुझी आठवण येतेय, रमणI, तुझे मी स्मरण करतेय
मला विसरूनच गेलास चक्क तू, मी तुझी कोणीच नाही का ?,
असा कसा बेदर्दी निघालास तू, तुला काहीच वाटत नाही का ?
या ऋतूत मी एकलीच आहे, माझं मन नाही लागत कश्यात
हा आवडता मोसम नावडताच झालाय, या माझ्या एकटेपणाच्या दु:खIत
ऋतूंचा राजा श्रावण आलाय, जळाने भिजत निसर्गही खुश झालाय,
आणि अश्यात तूच नाही इथे, हा ओला ऋतूही बघ मला उदास करून गेलाय
समजून जा, प्रियकरI, हा प्रेमाचा ऋतू भिजल्या धारांचा
जाणून घे, दिलबरI, हा प्रीतीचा मोसम बरसत्या शीत गारांचा
आज माझी प्रीत उदास आहे, तुझ्या विरहात मन निराश आहे,
त्या बरसत्या धारांबरोबर ही तनहाईही मला जIळत आहे, पोळत आहे
हा समI, हे वातावरण मनास कसं कसोसतय, मन मसोसतय
हा आसमI, हा मंजर दिलास आणिक दुःख देतोय, हृदयास होरपळतोय
जणू लग्न मंडप रिकामा झालाय, वधू लग्न करून आपल्या सासरी निघून गेलीय,
आता शहनाईचे काय काम, स्वरांची बरसIत करून तीही शांत झालीय
कित्येक मिनतवारी करून तू नाही कोणतीच देत दाद
बेदर्दीच आहे तू साजणा, तुला ऐकूच येत नाहीय माझी हाक
पलीकडेच गेला आहेस तू, तुला माझा समजतच नाहीय दर्द,
आता माझ्याकडे रुदनाशिवाय दुसरा कोणताही नाही मार्ग
तुला कळत कसं नाही, हे मलमली तारुण्य तुलाच देणं आहे
तुला समजत कसं नाही, ही माझी उभरती जवानी तुलाच भेट आहे
बघ समाज बसलाय नIवे ठेवायला, त्यांना प्रेम बीम काही कळत नाही,
पहा, समाज लागलाय बोलायला, आपले प्रेम त्यांना बघवत नाही
ही तुझी राधिका, प्रेमाची शमI जळत ठेवून याइथे उभी आहे
ही तुझी सारिका, प्रीतीची ज्योत मनात उजळत ठेवून कधीची उभी आहे
या अंधारलेल्या काळोखी जगात, ती तुला प्रेमाचा प्रकाश दाखवीत आहे,
आता तरी माझे मन ओळख, माझी प्रीत पारख, माझे प्रेम सच्चे आहे
बेदर्दी, बेहयI, बेदील, बेबाक साजणा, आता माझ्यावर थोडी तरी दया कर
बेमतलब, बेशर्मीने तुला मी बोलावीत नाहीय, आता थोडी तरी शरम कर
कोणताही शक करू नकोस, बेशक तुही माझ्यावर तितकच प्रेम कर,
आता मला बेगाना ठेवू नकोस, मला तडपत ठेवू नकोस, बेझिझक माझा स्वीकार कर
पहा श्रावण आलाय, डोलू लागलाय, बोलू लागलाय, गाऊही लागलाय
पाऊस कसा उतू चाललाय, भरभरून वहिलाय, सरसरून बरसलाय
आता तरी ये, सख्या, तू नाहीस तर हा श्रावण आता मोद, आनंद देत नाही,
आपल्या प्रेमाची दरी तू लांघून ये, तू दिसल्याशिवाय हे नयन तृप्त होणार नाही
देहात फुललाय निखारा, व्याकुळ आहे मन
पावसाच्या जलधारा, पोळताहेत तन बदन
प्रियकरI, तुझ्यावाचून नाही करमत, मला नाही राहवत,
तुझ्यावर माझा खूप आहे जीव, तूच आहेस माझं जीवन
देहात फुललाय निखारा, व्याकुळ आहे मन
पावसाच्या जलधारा, पोळताहेत तन बदन
तू आलास तर बहार येईल, श्रावण अधिक निखरून जाईल,
बेताब आहे माझं मन, साजणा, कधी होईल तुझं आगमन ?
-----श्री.अतुल एस.परब(अतुल कवीराजे)
-----दिनांक-03.09.2023-रविवार.
=========================================