राहून राहून सारखं तेच आठवतंय
कसा निघून गेलास ना तू त्यादिवशी
जणू काही बंद मुठीतली वाळू पटकन निसटून गेली...
एकदम अलगद...
नुकताच तर घेतला होतास तू
हातात माझा हात थेट..
अन नुकतीच तर झाली होती
तुझी माझी नजरभेट ...
हवाहवासा वाटणारा तुझा सहवास
अन निसटून चाललेली ती वेळ...
शब्द तर सारे अडकून पडलेले
बसत नव्हता कुठेच मेळ....
खूप जड पावलांनी तेव्हा
निरोप तुला दिला होता
लवकर परत येशील असा
वादाही तू केला होता
पण बघ ना हि वेळ.....
इथेच थांबून राहिलेय...
सूर्य आकाशात असूनही
नभ भरून आलंय...
हातावर पडलेल्या थेंबाकडे बघितलं ना
तेव्हा माझ्या लक्ष्यात आलं...
इथं तर माझ्याच मनाचं आभाळ भरून आलेलं
बरसण्यासाठी आता ते आतुर झालेलं...
अन त्यादिवशी ....तू अचानक समोर आलास
माझे विस्कटलेले केस हळूच बाजूला सारून
मला जवळ घेऊन म्हणालास ....
अग ए कडूबाई .....
बघ ना आलो कि आता मी...बघ कि...
पण......
लगेचच जाणीव झाली....पुन्हा एक भास असल्याची ......
तुझीच ती आठवण रे...सारखी जाणीव करून देते एकटेपणाची...
- monika