Author Topic: ती  (Read 1858 times)

Offline Vinod Thorat

  • Newbie
  • *
  • Posts: 16
ती
« on: October 28, 2010, 01:06:22 AM »

वाटत होत मला
तीच  माझ्यावर प्रेम आहे,
ती म्हणेल हो
मी फक्त विचारायची देर आहे !
तिच्या प्रत्येक कृतीत दिसत होता मला
मला हवा असलेला अर्थ,
तिच्याशिवाय जीवन माझे मला
वाटत होते व्यर्थ !
पण एक दिवस अचानक
माझ्या काळजाचा ठोका क्षणभर चुकला,
जेव्हा तिच्या मोबाईल मध्ये मला
दुसऱ्याचा फोटो दिसला !
तीच प्रेम आहे त्याच्यावर
कळले तेव्हा वेडापिसा झालो होतो मी,
किनारा दिसत असूनही
पाण्यात गटांगळ्या खात होतो मी !
तिच्या आठवणीत
जागवली मी ती संपूर्ण रात्र,
त्या रात्रीनेच दिला मला
माझ्या आयुष्याचा मंत्र !
आयुष्य नाही थांबत कोणासाठी
हे तिनेच सांगितलं मला,
'शो मस्ट गो ऑन' चा खरा अर्थ
तेव्हा कळला मला !
ती माझी नसली तरी
माझ्या आठवणीत मात्र तीच आहे,
माझी कविताही तीच
आणि प्रेरणाही तीच आहे !

Marathi Kavita : मराठी कविता


Offline Vinod Thorat

  • Newbie
  • *
  • Posts: 16
Re: ती
« Reply #1 on: September 10, 2015, 09:31:51 PM »
कविता आवडल्यास कॉमेंट जरूर करा

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
एकावन्न अधिक अकरा किती? (answer in English):