Author Topic: दुमडलेले पान...  (Read 1141 times)

Offline anolakhi

  • Jr. Member
  • **
  • Posts: 79
  • Gender: Male
    • http://www.durava.blogspot.com
दुमडलेले पान...
« on: November 04, 2010, 09:00:38 PM »
माझ्या वहीतले दुमडलेले पान...
जणू वादळाला..लपवून ठेवलेले..मोकळे रान...

शब्द-शब्द....अर्धवट...ओळ्याही अधुर्या...
पुसट चाललेली  शाई..आणिक  त्यात..उठून दिसतो...सुखलेल्या आसवाचा  ठिपका...
तिथेच जपून ठेवलेले सुखलेले झाडाचे पान...
जणू वादळाला..लपवून ठेवलेले..मोकळे रान....

अनोळखी..

Marathi Kavita : मराठी कविता