तु येशील नक्की येशील
गडद काळोखाला जेव्हा
भिती वाटु लागेल माझीच
निपचीत हात जेव्हा तुझी
सोबत शोधु लागतील
तेव्हा.......... तेव्हा तु येशील नक्कीच येशील
उन्ह काळवंड्तील ... भरदुपारी
माझ उघड दार वा-यावर
हलु लागेल
तुझी वाट पाहु लागेल
तेव्हा.......... तेव्हा तु येशील नक्कीच येशील
तुझ्या आसवांना नवी वाट फ़ुटेल
तेव्हा माझ्या जखमा
आतुर होतील...भिजण्यासाठी
तेव्हा.......... तेव्हा तु येशील नक्कीच येशील
आणि जरी नाही आलीस तरी
सरणावर जेव्हा
माझ प्रेत आगीशी खेळेल
ठीण्ग्या हुंद्के देतील
तेव्हा.......... तेव्हा तु येशील नक्कीच येशील