Author Topic: मी अजुन वेडा होतो ...  (Read 1298 times)

Offline shashank pratapwar

  • Newbie
  • *
  • Posts: 35
मी अजुन वेडा होतो ...
« on: November 19, 2010, 05:18:25 PM »
मी अजुन वेडा होतो ,
ते स्वर तिचे स्मरताना,
रात्रिस मजला बिलगती,
त्या धुंद आर्जवी ताना.


आकंठ रसाने भिजतो,
न उरे कोरडी जागा ,
मधुनाद तिच्या कंठीचा,
मम हृदयी आहे जागा ।


जरी गीत अधूरे राहिले ,
मज दू:ख नसे त्याचे ,
मज पुरेल आयुष्याला ,
ते बोल तिचे मुखड्याचे।

- शशांक प्रतापवार

Marathi Kavita : मराठी कविता