तू दिलेस या हृदयी
घाव इतुके गंभीर खोल
कि जखमांच्या त्या निशाणी
पाहणे टाळले साऱ्या दिशांनी.....................
अगतिक हतबल मी तेव्हा
आसू थांबलेच न केव्हा
अवस्था ती माझी पाहुनी
सांत्वन टाळले साऱ्या दिशांनी..................
का तुझे ते असे वागणे
कधी मला न उमजले
प्रश्न मनी काही असे रुजले
कि गुंतागुंत त्यांची देखोनी
उत्तर टाळले साऱ्या दिशांनी.....................
जीवनास या, आता पुरता विटलो
येउंदे मृत्यू मग एकदा सुटलो
म्हटले घेई पंचमहाभूतांत समावोनी
पण अखेरचे तेही स्वप्न
टाळले साऱ्या दिशांनी
टाळले साऱ्या दिशांनी..........................