कोणी सोबत नसल तरी , तरी तो माझ्या सोबत असतो
झालेच कधी दु:ख अनावर , तर येउन हलकेच अश्रु पुसतो .
कोणी नाही म्हणून काय झाले , "मी आहे ना " म्हणतो ,
कितीही जण असतील सोबत तरी , तोच एकटा मला जाणतो .
कधी आनंदाची उघडून कवाड , मी जाते दुस-यापाशी, पण ते रमलेले त्यांच्याच विश्वात पाहून, मी परत येते होते तशी .
मग तो म्हणतो,"उदास नको होऊ, मी आहे ना तुझ्याजवळ ,
सांग मला तुझा आनंद , माझ्यात विरून जाइल तुझी कळ " .
कधी एखादा क्षण हळवा , भिजवतो डोळ्याची पापणी,
ओघळले जरी लाख अश्रु , पुसाया नसते कोणी ,
मग परत जवळ येतो तो , माझे अश्रु वाटुन घेतो ,
शब्दानच्याही पलीकडचा आनंद , ओंजळीत माझ्या देऊन जातो.
कधी येतो खुप राग ,पण हक्काच माणूस नसत काढायला ,
उधाणलेल्या त्या सगारामधून , मला किनारी आणून सोडायला .
पण अशा वेळी माझ्याबरोबर , खुप खोल तो येतो ,
करुन माझे सांत्वन ,हळूच मिठीत त्याच्या घेतो .
कधी चलबिचल होते मनाची , अन वाटते खुप अस्वस्थ
पण बोलायला समोर कोणीच नसत, सगळे आपल्याच विश्वात मस्त .
तेंव्हा मन माझे जाणायाला , तो माझ्या जवळ येतो ,
झेलुनी दु:ख अंतरीचे , मला बोलकेपण तो देतो.
कधी ओथंबतात भावना , अन अडतात मनाच्या दारी ,
सचून राहतात तशाच मनी , जरी सोबत असतील सारी.
अशा वेळी त्याच्या मनाचे दार , तो माझ्यासाठी उघडतो ,
मग मानून समाधान , मनाचा पारवा त्यातच बागड़तो .
वाटत असेल वाचताना , खरच कोण असेल तो ?
एवढा सांभाळून घेणारा , खरच खुप गुणी दिसतो .
पण खरतर ह्या जगात , कोणीच कोणाच नसत ,
असेलच कोणी सोबत तर , केवळ मृगजळच असत.
म्हणुनच मी स्वीकारली सोबत त्याची ,
खात्री आहे मला तो कधी नाही सोडणार ह्याची .
कोणाला पटेल किंवा नाही पटणार कुणा ,
आयुष्यभर अन आयुष्यानंतर सोबत राहील " माझा एकटेपणा "
आयुष्याच्या वाटेवरती मी खुपदा अडखळले ,
रस्ता वाळणाचा होता जरी, सोबत होते सगळे.
पण राहिला अखंड सोबत, तो माझा एकटेपणा,
व्यापुनी सारी धरती , त्याने जिंकले आहे मना.
लोकाना नको वाटतो एकटेपणा , पण तोच खरा सोबती ,
क्षण दोन क्षण सोबत देणारी, सारी खोटी असतात नाती .
कितीही आली संकट , तरी नाहीं झीजणार ज्याचा कणा.
असा माझा अखंड सोबती , " माझा एकटेपणा "!!!!!!!!!!!!
रूपा