Author Topic: जाते म्हणतेस हरकत नाही एवढे तरी करून जा.  (Read 1607 times)

Offline grmane_apd

  • Newbie
  • *
  • Posts: 7
  जाते म्हणतेस हरकत नाही एवढे तरी करून जा.   नाही अडवणार तुला मी जाताना चेहर मात्र हसरा ठेवून जा.   आजपर्यंत जी दंगा मस्ती केली सगळे तू विसरून जा.  होते कोणी माझ्या  नावाचे तुझ्या आयुष्यात नावच ते पुसून जा   नाही फरक पडणार मला तुझ्या जाण्याने   जाताना  ओले डोळे  तुझे मात्र पुसून जा.   जमणार नही मला तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी अश्रू    माझ्यासाठीच  ते अश्रू शिलक ठेवून जा.    नको मिळाया आयुष्यात परत मला  तुझ्यासारखी जीव लावणारी   एवढी शेवटची  प्राथर्ना माझ्यासठी तू करून जा.   तू कुठेही राहा सुखी राहा सुख माझे त्यात आहे  स्वतःला मात्र तू जपत जा.   ............... गजानन [एक मजेशीर जग ]