शोधू कुठे
डोळ्यांनी तू दिसत नाही
स्पर्शानेही जाणवत नाही
वास कुठे तुझा येत नाही
बसतो कुठे तू दडुनी?
पालनकर्ता विश्वाचा तू
दुख:हर्ता रे भक्तांचा तू
काळ कर्दन पाप्यांचा तू
शोधू कुठे या धरणी?
सांग बघू रे आज मला तू
काय करू दिसशील मला तू
कर पुरे हा लपंडाव तू
नमस्कार तव चरणी
दिव्य तुझे ते रूप पाहावे
नेत्रांमध्ये भरून घ्यावे
जीवाचे कल्याण करावे
आशिर्वाद दे भरुनी
-स्वप्नील वायचळ