जन्मोजन्मी सोबत असावी तुझी
हेची जाणले मनी माझ्या,
काय मनी होते तुझ्या ,
कधी कळले न मला !!
सुख दुखाच्या वाटेवरी
तुझा हात राहील माझ्या हाती,
हेची जाणले मनी माझ्या,
काय मनी होते तुझ्या ,
कधी कळले न मला !!
गेलीस दूर तु सोडून मला
दिला त्रास फार मी तुला
पण त्या त्रासातले प्रेम कधी
कळले न मनी तुझ्या,
पण काय मनी होते तुझ्या ,
कधी कळले न मला !!