Author Topic: मनातला सूर्य  (Read 907 times)

Offline mrudugandha

  • Newbie
  • *
  • Posts: 10
मनातला सूर्य
« on: January 11, 2011, 09:15:42 PM »

माझ्या मनात रोज सूर्य उगवतो,
त्याच्या मनात जाऊन होतो अस्त!
कोवळ्या उन्हात जळताना मला पाहून,
साध्या संधीप्रकाशानेही, तो होतो त्रस्त!

माझ्या मनात रोज सकाळ होते,
त्याच्या मनात ती होते सायंकाळ!
मी सुस्त, ताजी, मस्त, टवटवीत,
माझ्या काळजीने तो सदा डळमळीत!

रोजचा दिवस मला नवा, सगळ्याचेच कुतुहल,
त्याला मात्र गुपचुप येणाऱ्या संकटाची चाहूल!
मला नाही फिकीर, चिंता, मी आहे स्वस्थ!
हसण्याचा प्रयत्न करतो, तो मनातून अस्वस्थ!

त्याला व स्वतःला समजावत मी म्हणते!
‘आयुष्य आहे, हे असं काहीतरी व्हायचंच!’
डोळ्यातल्या पाण्यासह तो प्रश्‍न विचारतो,
तुला मरताना बघून मी कसं जगायचं?

mrudugandha

Marathi Kavita : मराठी कविता


Offline स्वप्नील वायचळ

  • Jr. Member
  • **
  • Posts: 182
  • Gender: Male
Re: मनातला सूर्य
« Reply #1 on: January 12, 2011, 11:32:32 AM »
wah..farch sundar bhav....
God bless these feelings
Very Very lovely