Author Topic: शापित प्रीती.....  (Read 2618 times)

Offline दिगंबर कोटकर

 • Newbie
 • *
 • Posts: 31
 • Gender: Male
 • Digamber A Kotkar
  • marathi.majhya kavita
शापित प्रीती.....
« on: January 31, 2011, 10:06:00 AM »

 
निळ्याशार रत्नाकर,

अन त्या फेनिल लाटा,

सागराचा तो मनोहर,

अन नयनरम्य किनारा,

आनंदापारी माझ्या,

वेदनाच होती मना,

मनाचे समाधान,

हरवले आठवणींत तुझ्या,

यातनांनी केले वास्तव,

मनामध्ये माझ्या.........
 
 
झाली असेल चूक,


कळत-नकळत,

त्याचा परिणाम ग,

इतका झाला भयंकर,

सुखाचा किनारा,

शोधिते माझी नाव,

निवाऱ्यासाठी हक्काचे,

मिळावे एखादे गाव....माझ्या नशिबी नव्हते,

सुख अन समाधान,

भाळी लिहिलंय ग माझ्या,

दु:ख करणे सहन,

मृत्यूचे हि भय मला,

आता सतावत नाही ,

यमाच्या दुतालाही,

मी आता घाबरत नाही.........यमदूत एकदा माझ्यासमोर,

प्रगट ग झाला,

मला म्हणे, सांग तुझी,

शेवटची इच्छा मला.....याम्दुताला पाहून,

हास्य आले माझ्या ओठी,

माझ्या चेहऱ्यावर हास्य पाहून,

त्याच्या कापली आली आठी....माझी शेवटची इच्छा, प्रिये,

मी जाहीर ग केली,

तुझ्याच दर्शनाची मी,

त्याच्याकडे मागणी ग केली,

ऐकून मागणी माझी,

हसू आले त्याला,

दारात मृत्यू उभा असूनही,

म्हणे,भेटायचेय प्रियेला......उपहास करू नकोस,

मूर्ख , यमदुता,

प्रेमापुढे टेकवती,

देवी-देवताही माथा...रामासंगे वनवासी,

झाले हाल सीतेचे,

तरीही डगमगले नाही,

मन त्या जानकीचे,

सावित्री अन सत्यवान,

अमर आहे प्रेम त्यांचे,

लक्षुमणाच्या विरहाने,

डोळे पाणावती उर्मिलेचे,

कामदेवाच्या दुराव्याने,

घायाळही रती ...........मग तूच सांग, यमदुता,

का रे ? शापित ही प्रीती,

का रे ? शापित ही प्रीती.....सलाम माझा, त्या प्रेमवीरांना,

जे फक्त आठवणीवरच तळमळतात,

का? कसे? कुणास ठाऊक,

ते असे शापित जीवन जगतात......दिगंबर......
« Last Edit: January 31, 2011, 10:06:46 AM by दिगंबर कोटकर »

Marathi Kavita : मराठी कविता


Offline vivekphutane

 • Newbie
 • *
 • Posts: 18
Re: शापित प्रीती.....
« Reply #1 on: January 31, 2011, 11:44:31 AM »
Khara pream shapit ka asta ajun paryant kunalach kalale nahi
Tarihi pream karanaraynchi sankhya kami honar nahi.

Offline Lucky Sir

 • Jr. Member
 • **
 • Posts: 59
Re: शापित प्रीती.....
« Reply #2 on: February 02, 2011, 10:53:53 PM »
सलाम माझा, त्या प्रेमवीरांना,

जे फक्त आठवणीवरच तळमळतात,

का? कसे? कुणास ठाऊक,

ते असे शापित जीवन जगतात......

AMHI PAN JAGAT AHOT!!!!!!!!!

Offline vivekphutane

 • Newbie
 • *
 • Posts: 18
Re: शापित प्रीती.....
« Reply #3 on: February 03, 2011, 10:33:28 AM »
Nusatach jagu naka,tar shap sudha
mage hatel ashi jigar thewa............

Offline vebsi

 • Newbie
 • *
 • Posts: 5
Re: शापित प्रीती.....
« Reply #4 on: February 03, 2011, 07:18:19 PM »
prem mhanje prem asta , te dyayacha asta

Offline santoshi.world

 • Sr. Member
 • ****
 • Posts: 1,371
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: शापित प्रीती.....
« Reply #5 on: April 03, 2011, 06:39:54 PM »
chhan ahe kavita
सलाम माझा, त्या प्रेमवीरांना,
जे फक्त आठवणीवरच तळमळतात,
का? कसे? कुणास ठाऊक,
ते असे शापित जीवन जगतात.

Offline jyoti salunkhe

 • Jr. Member
 • **
 • Posts: 422
Re: शापित प्रीती.....
« Reply #6 on: April 07, 2012, 02:23:20 PM »
Very Nice  :)

PINKY BOBADE

 • Guest
Re: शापित प्रीती.....
« Reply #7 on: April 10, 2012, 04:15:54 PM »
kavita kup chan lihali aahes mitra, :) thanx

Offline प्रशांत नागरगोजे

 • Full Member
 • ***
 • Posts: 665
 • Gender: Male
  • my poems
Re: शापित प्रीती.....
« Reply #8 on: April 10, 2012, 09:47:31 PM »
khup chaan ahe kavita.... :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
अकरा गुणिले दोन किती ?  (answer in English number):