Author Topic: कारण तू नसतेस माझ्या संगतीला...  (Read 2390 times)

Offline sachin tale

  • Newbie
  • *
  • Posts: 13
  • Gender: Male
कसा सांगू तुला , तू कळत नाही मला
गेल्या कित्येक दिवसाला , वाट पाहतोय त्या रस्त्याला
एकटा चालतो त्या वाटेला , जी वाट जाते माझ्या घराला
घर दिसत नाही त्या रस्त्याला , कारण तू नसतेस माझ्या संगतीला...
 
फिरत आसतो त्या वाटेला , आठवतो क्षण मनात साठवलेला
असे वाटते मनाला , तुझ्या विना नाही अर्थ जगण्याला
ज्या  वाटेवरती हसलो , ज्या  वाटेवरती थांबलो
त्या वाटेवरती जाताना , ती वाट विचारती माझ्या मनाला
कुठे आहे ती सांग ना , करमत नाही आम्हाला
मी म्हणालो त्या वाटेला , मी हि रडतोय आठवून त्य क्षणाला
कारण तू नसतेस माझ्या संगतीला...
 
तुझ्या माझ्या मैत्रीला , सूर्य आसतो साक्षीला
थांब म्हणतो त्य चंद्राला , चंद्र उगवला आहे त्य वाटेला
मी विचारले त्या सूर्याला , का गप्प या घडीला
चंद्र नाही माझ्या सोबतीला , आठवण आहे तिची , मनातल्या या घरट्याला
बघ तुझ्या वाचून त्रास होतोय या सर्वाना
कारण ज्हेवा तू नसतेस माझ्या संगतीला... सचिन तळे