Author Topic: प्रेम तुझं खरं असेल तर  (Read 5910 times)

Offline sharad12395

 • Newbie
 • *
 • Posts: 11
प्रेम तुझं खरं असेल तर
« on: March 11, 2011, 11:28:52 AM »
प्रेम तुझं खरं असेल तर
जीव तुझ्यावर ओवाळेल ती
स्वत:च्याचं भावनांचं मन
शेवटी ती मारेल तरी कीती..

भावना तुझ्या शुद्ध असतील, तर
तीही त्यात वाहून जाईल
मनावर अमृत सरी झेलत
तीही त्यात न्हाहून जाईल..

विचार तुझा नेक असेल, तर
तीही तुझा विचार करेल
हृदयाच्या तिच्या छेडून तारा
सप्तसूरांचा झंकार उरेल..

आधार तुझा बलवान असेल, तर
तीही तूझ्या कवेत वाहील
मग, कितीही वादळं आलीत
तरी प्रित तुमची तेवत राहील..

आशा सोडण्या इतकं
जिवन निराशवादी नाही रे
तिला न जिंकता यावं इतकं
मानवी हृदय पौलादी नाही रे..

पण, मित्रा जर ती नाहीचं आली
तरीही तू हार मानू नकोस
तू तर प्रामाणिकपणे खेळलास
आयुष्याला जुगार मानू नकोस..

शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं
थांबत नाही ते कोणासाठी
घे भरारी पुन्हा गगनी
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी.
.........

Marathi Kavita : मराठी कविता


Offline kpkurankar

 • Newbie
 • *
 • Posts: 1
Re: प्रेम तुझं खरं असेल तर
« Reply #1 on: March 14, 2011, 01:00:17 PM »
खूप खूप झबरदस्त सुंदर कविता आहे हि... माझ्या तर अक्षरशहा डोळ्यांतून पाणी आलं

thanks
kamlesh

Offline SAGARaje MARATHE

 • Newbie
 • *
 • Posts: 10
 • Gender: Male
 • चंद्राला चांदनी प्रिय होती,
  • http://www.orkut.co.in/Main#Profile?uid=12899177977254306326
Re: प्रेम तुझं खरं असेल तर
« Reply #2 on: March 17, 2011, 12:14:44 AM »
Very Nice......yarr

Offline Jai dait

 • Jr. Member
 • **
 • Posts: 75
Re: प्रेम तुझं खरं असेल तर
« Reply #3 on: March 18, 2011, 02:41:51 PM »
mast ahe...

Offline niteenpund

 • Newbie
 • *
 • Posts: 6
Re: प्रेम तुझं खरं असेल तर
« Reply #4 on: March 19, 2011, 08:50:41 AM »
nice .............friend.......

Offline mleena.pune

 • Newbie
 • *
 • Posts: 16
Re: प्रेम तुझं खरं असेल तर
« Reply #5 on: April 07, 2011, 02:04:26 PM »
Gud One..


chan kavita ahe..

Offline mady108

 • Newbie
 • *
 • Posts: 22
Re: प्रेम तुझं खरं असेल तर
« Reply #6 on: May 11, 2011, 05:58:20 PM »
kay baat aahe............mast

Offline chetant087

 • Newbie
 • *
 • Posts: 48
 • Gender: Male
  • माझा ब्लाग -
Re: प्रेम तुझं खरं असेल तर
« Reply #7 on: July 17, 2011, 03:19:24 PM »

"शेवटी आयुष्य हे वाहतचं राहतं
थांबत नाही ते कोणासाठी
घे भरारी पुन्हा गगनी
नव्यानं कुणीचा तरी होण्यासाठी."

- मस्त :)

 

With Quick-Reply you can write a post when viewing a topic without loading a new page. You can still use bulletin board code and smileys as you would in a normal post.

Name: Email:
Verification:
Type the letters shown in the picture
Listen to the letters / Request another image
Type the letters shown in the picture:
पाच गुणिले पाच किती ? (answer in English):