बेरंग करून माझी दुनिया, गेलास तू अवेळी
कशी रंगणार सख्या रे, तुजविण माझी होळी
रंगलेल्या दोन बोटांचे ठसे
अजुन तसेच माझ्या गालावरी
स्मरणात आहे माझ्या, कशी मी
धुंद होतसे, तुझ्या तालावरी
गोडही लागणार नाही, आता पुरणाची पोळी
कशी रंगणार सख्या रे, तुजविण माझी होळी...
सारेच रंग फिके पडले माझ्यासाठी
पण मी तुझ्याच एका रंगात रंगले
तुझा अभाव - माझं जीवन बनले
पण जगण्याचे जणू स्वप्नच भंगले
खाक झाल्या सा-या आशा, स्वप्नांची राख-रांगोळी
कशी रंगणार सख्या रे, तुजविण माझी होळी...
-जय