तुला नक्की माझी आठवण येणार कधी न कधी
पण मी नसणार तेह्वा तुझ्या अवती भोवती
डोळे बंद करून तू हाक मारशील वर गग्नामधी
पण कदाचित मीच नसणार या जगा मधी...
मला माहितीय , तू एकांतात जरूर पडणार
तुला माझी गरज कधी न कधी भासणार
तुझ्या हाकेला धाऊन मी नक्की येणार
पण तुला माझा अस्तित्व नाही जाणवणार
कारण तेह्वा मीच या जगी नसणार....
माझ्या सोबत घालवलेला हर एक क्षण तू आठवणार
आठवलेल्या क्षणाचा तू विचार करणार
“तुझी मला आठवण येतीय” आशी तू नक्की म्हणार
पण खूप उशीर झला असणार
कारण तेह्वा मीच या जगी नसणार
आज तुझ्या सोबत अनेक मित्र असतील
काही स्वार्थी , काही खरे , तर काही फायदे उचलणारे भेटतील
मी आजून तुझ्या अंगाला स्पर्श हि न केलेला तुला जाणवतील
तेह्वा तू माझ्या सहवासा साठी नक्की आतुर होशील
पण कदाचित माझच अस्तित्व या जगी नसतील .... सचिन तळे