Author Topic: मधुर मिलन  (Read 1594 times)

Offline Kiran Mandake

  • Newbie
  • *
  • Posts: 41
  • Gender: Male
मधुर मिलन
« on: April 10, 2011, 01:19:03 AM »
चंद्र म्हणाला चांदणीस ढगाळलेल्या आकाशात मी एकटाच फिरत होतो
कधी इथे , तर कधी तिथे एकसारखा तुला मी शोधत होतो !!धृ!!
ह्यास त्यास विचारून मी थकलो
तू येईना हे पाहून आता खरच रुसलो
रुसून झालाय बराच वेळ
का करतेस असा माझा छळ ?
शोधून शोधून तुला आता बराच मी थकलो आहे
तुला नाही खर वाटणार तुझ्यामुळेच रडलो ग
रडत होतो तुझ्यासाठी
मला भेटली नाहीस म्हणून खूप मी रडलो
लोक मात्र खूप नाचले
पहिला पाऊस पडत होता म्हणून
तुझी माझी भेट झाली हे तुला मला आवडले
लोक मात्र म्हणतात कसे आज लक्ख चांदणे पडले !!
 
( विमलज)

Marathi Kavita : मराठी कविता