तुझ्या सोबत एक क्षण जगलो ....तितकं पुरेसं आहे आता,
पण तुझी जन्मभर साथ लाभली असती तर......
निदान पुढच्या जन्माची हाव तरी सुटली असती.
दरवर्षी या पाटातून बरंचस पाणी वाहून जातं.
तरी येणार नविन पाणी हे नित्यनवीनच असतं,
तुझं येणही त्या पाण्यासारखच आहे, मी आपला जुनाच पाट.
काही मानसं काही क्षणांसाठीच जगतात, मी हि त्यातलाच.
बरं झालं तुला माझी उशिरा का होईना पण आठवण झाली,
आता मारायला मी मोकळा.
आयुष्याच्या वळणा वळणावरती बरंच काही निसटून जातं,
हवं असतं बरंच काही पण मर्यादांचा बांध आडवा येतो,
आज तुझ्या मोकळ्या मिठीचा काही उपयोग नाही.
तुझी तळमळ मला कळतेय कारण मी हि भोगलंय तिला,
दोघांच्याही आयुष्यात एकमेकांकडून एकमेकांबद्दल प्रेम आणि उपेक्षा आहेच.
फक्त दोघांच्याही भोगण्याच्या वेळा मात्र सारख्या नाहीत.
आज तुला रिकाम्या हातांनी पाठवतांना कससच वाटतंय,
पण मीही माझे हातच कुणा इतराला दिलेयत,
कधीकाळी तुला देणार होतो पण तूच उशीर केलेलास.
सावर स्वतःला हे मी सांगू नाही शकतं,
कारण आज पर्यंत ते मलाही जमलंच नाही,
धीर शोध थोडासा भेटलाच तर, वेदना कमी होतील.
हात आधीच दिलेयत कुणासाठी तरी,
आणि पाऊल तुझ्या दिशेत गुंतू पहातंय,
आज खऱ्या अर्थाने मी पांगळा झालोय.
तुझ्या बाबतीत घडलंय ते नक्कीच वाईट आहे,
पण हे झाल्यावर तू प्रथम माझ्याकडेच आलीस,
बरं याचं वाटतंय कि माझ्या प्रेमावर तुला आधीही विश्वास होताच.
पण आता मी वचनबद्ध झालोय तिच्यासोबत,
तिच्याशी अवहेलना तरी कशी करू मी, तूच सांग,
मित्रत्वाचं नातं आता फक्त टिकवून ठेवीन एवढं मात्र खरं
.....अमोल