तू
जीवनाच्या प्रवासात तासन - तास उभ राहून
एखाद्या स्त्रिची वाट पाहण्याची सवय तू मला लावलीस
आणि स्वत : मात्र नामानिराळी राहिलीस ......
सौंदर्याची स्तुती करायला ती ही कवितेतून
सवय तू मला लावलीस
आणि स्वत : मात्र एकही कविता कधी ही नाही लिहिलीस............
मी होतो त्या पेक्ष्या सतत वेगळा
दिसण्याची वागण्याची सवय तू मला लावलीस
आणि स्वत : मात्र एक सर्व सामान्य गृहिणी झालीस ..........
तुझी प्रसिद्धी माझ्यावर लादून
मला प्रसिद्धी मिळविण्याची सवय लावलीस
आणि स्वत : मात्र काळ्या कुट्ठ अंधारात गडप झालीस .......
आयुष्यात सतत काहीतरी शोधत मिळवत
राहण्याची सवय तू मला लावलीस
आणि स्वत : मात्र सर्व कला गुणांचा त्याग करून बासलीस..........
माझ्यातील मला तुझ्यासाठी शोधण्याची
सवय तू मला लहानपणापासूनच लावलीस
आणि या अर्थशून्य जगात अर्थहीन जीवन जगण्यास मला एकट सोडून निगून गेलीस .......
कवी
निलेश बामणे