Author Topic: ‘चंद्र’ डागाळलेला बरा  (Read 1770 times)

Offline aryanbhv

 • Newbie
 • *
 • Posts: 27
विषय हा टाळलेला बरा,अन्य हाताळलेला बरा ॥
आठवांच्या फुलांतील ‘तो’मोगरा जाळलेला बरा ॥
हट्ट का उत्तराचा उगा?प्रश्न रेंगाळलेला बरा ॥
विश्व खोटे जरी भोवती,शब्द मी पाळलेला बरा ॥
लावु दे पेच त्यांनाच, मीदोर गुंडाळलेला बरा ॥
हौस ना थांबण्याची मला,पाय भेगाळलेला बरा ॥
मिरव ‘सौभाग्य’ तू आपुले,‘चंद्र’ डागाळलेला बरा ॥

Marathi Kavita : मराठी कविता


Offline santoshi.world

 • Moderator
 • Sr. Member
 • *****
 • Posts: 1,372
 • Gender: Female
 • मन माझे तुफान वारा, अश्रू माझे पाऊसधारा...
  • My Blog - Kavita, charolya, paintings, rangolies etc.
Re: ‘चंद्र’ डागाळलेला बरा
« Reply #1 on: April 26, 2011, 06:08:29 PM »
chhan ahe .......

Offline chetant087

 • Newbie
 • *
 • Posts: 49
 • Gender: Male
  • माझा ब्लाग -
Re: ‘चंद्र’ डागाळलेला बरा
« Reply #2 on: July 17, 2011, 03:39:45 PM »
खूपच छान :)