होतास सोबत माझ्या तू
पावसात भिजताना, ते कणीस खाताना
त्या दूरच्या प्रवासात जाताना
कधीतरी लटकेच भांड्ताना
तर कधी माझा रुसवा दूर करताना
हलकेच गोड बोलायचास तू?
हळूच यायचास माझ्या प्रत्येक स्वप्नात तू
प्रत्येक स्वप्न जगताना
खूप आनंद द्यायचास तू... नाही तू नाही केलेस काहीच जे पहिले मी
स्वप्नेच होती ना ती...
पावसाच्या सरीत भिजताना आता रडते मी ..
दिसू नयेत कुणालाही अश्रू हेच पाहते मी
स्वप्न पडतील परत म्हणून आता झोपतच नाही
भीती वाटतेय मला आता जगताना ...
पण नाहीत तुझी ती स्वप्न मला आधार देताना..
-- Rani