या मैफिलीच्या सुरांची छळते आता रागदारी,
त्यात काळजाची किनर जळते विरहात सारी.
मर्मस्थानी घाव देतो मैफिलीचा तो उखाणा,
वेदनेस दवा देई हा जिवंत मैखाना.
बासुरीची सरगम आणि स्वरांची सानिधप,
सुरांच्या आर्ततेत तू नसल्याचा शरचाप.
एकच लामणदिवा वरी जळताना मंद मंद,
आणि तू नसल्याच्या जाणीवेचा पसरे दर्द धुंद धुंद.
गायकाची गायकी ती नि स्वरांचे चढ उतार,
थैलीतील मोगर्याची बाहेर येण्या आर्त पुकार.
हा अवसान घात केला तुझ्या हट्टी स्वभावाने,
पण तुझ्यावरी तरी रागावून कसे जगावे या जीवाने.
जरी अनावर हि मैफल, रंगणारी रात आणि,
तुझ्या पैंजणाची साथ ना, येते नकळत डोळ्यात पाणी.
दुलईस भार आता जागवून हि रात कोरी,
आज पुरी व्यर्थ गेली या सुरांची रागदारी.
................अमोल